मोदी, शहांकडे डिग्री नाही पण देशाच्या सर्वोच्च पदांवरची नोकरी आहे, संजय राऊत यांची सडकून टीका

मोदी, शहांकडे डिग्री नाही पण देशाच्या सर्वोच्च पदांवरची नोकरी आहे, संजय राऊत यांची सडकून टीका

नागपूरमध्ये आज शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात विदर्भातील विकास आणि रोजगारावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे. यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर राऊत यांनी सडकून टीका केली आहे. मोदी, शहांकडे डिग्री नाही पण देशाच्या सर्वोच्च पदांवरची नोकरी आहे, असे वक्तव्य करत राऊत यांनी समाचार घेतला आहे.

काय म्हणाले राऊत?

डिग्री न मिळवता रोजगार देणारा एकच व्यवसाय आहे तो म्हणजे राजकारण. आमचे नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडे डिग्री आहे आणि नाही दोन्ही. आमच्या पंतप्रधानांची डिग्री ही खरी की खोटी आहे, यावर संसदेतही चर्चा झाली. पंतप्रधानांकडे डिग्री नाही पण देशातील सर्वोच्च नोकरी मिळाली आहे पंतप्रधानपदाची. आमच्या गृहमंत्र्यांकडे कोणतीही डिग्री नाही पण त्यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाची नोकरी मिळाली आहे गृहमंत्रीपदाची, असे म्हणत राऊत यांनी मोदी, शहांवर सडकून टीका केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;