बिग बॉस मराठीच्या निर्मात्यांवर मोठा आरोप, कायमच वर्षा उसगांवकर यांनाच…

बिग बॉस मराठीच्या निर्मात्यांवर मोठा आरोप, कायमच वर्षा उसगांवकर यांनाच…

बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये मोठे हंगामे होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे बिग बॉस मराठीचे हे पहिले सीजन असावे, ज्यामध्ये इतके मोठे धमाके होताना दिसत आहेत. या सीजमध्ये अनेक मोठे कलाकार सहभागी झाले आहेत. सर्वात वेगळी बाब म्हणजे महेश मांजरेकर नव्हे तर रितेश देशमुख या सीजनला होस्ट करताना दिसतोय. रितेश देशमुख याचा अंदाज प्रेक्षकांना चांगलाच आवडताना दिसतोय. वर्षा उसगांवकर बिग बॉस मराठीच्या घरात दाखल झाल्या आहेत. यासोबतच अनेक चर्चेत असलेली नावे देखील या सीजनमध्ये सहभागी झाले आहेत. बिग बॉस मराठीला सुरूवात झाल्यापासून अनेक टास्क बिग बॉसच्या घरात झाले.

बिग बॉसच्या घरात कुठलाही टास्क असो…त्यामध्ये घरातील एक सदस्य संचालक असतो. टास्कचा सर्व निर्णय हा संचालकावर सोडला जातो. एखाद्या टिमने चांगला टास्क खेळला असेल आणि त्या टिमला संचालकाला विजयी घोषित करायचे नसेल तर तो संचालक तसे करू शकतो. याला बिग बॉस देखील विरोध करू शकत नाहीत.

बिग बॉस मराठी 5 ला सुरूवात झाल्यापासून अनेक टास्क झाले आहेत. मात्र, जवळपास टास्कमध्ये वर्षा उसगांवकर याच संचालकाच्या भूमिकेत दिसल्या. सतत वर्षा उसगांवकर याच टास्कसाठी संचालक बनत असल्याने लोक हैराण झाले. कारण कोणत्याही टास्कसाठी संचालक कोणाला बनवायचे हा निर्णय बिग बॉसच्या निर्मात्यांचा असतो.

आता एक कॅप्टनचा टास्क नुकताच बिग बॉसच्या घरात झाला. तो टास्क फक्त सोडला तर इतर टास्कमध्ये जास्त करून वर्षा उसगांवकर याच संचालक असतात. वर्षा उसगांवकर या कायमच निकी तांबोळी आणि तिच्या टीमला विरोध करताना दिसतात. निकी तांबोळीसह अनेक सदस्य टास्कमध्ये संचालकाकडून आमच्यावर अन्याय झाल्याचे म्हणताना देखील दिसले आहेत.

जास्त करून टास्कला वर्षा उसगांवकर याच संचालक होत असल्याने प्रेक्षकही हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी यांच्यामध्ये घरात मोठा वाद गेल्या आठवड्यामध्ये बघायला मिळाला. यासोबत निकी तांबोळी आणि छोटा पुढारी बिग बॉसच्या घरात एकसोबत जास्त वेळ घालवताना दिसतात. मात्र, निकी तांबोळी हिने अगोदरच म्हटले आहे की, छोटा पुढारी माझा भाऊ आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;