श्वेता बच्चन हिने केली ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांच्या नात्याची पोलखोल, म्हणाली, पत्नीबद्दल…
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत एप्रिल 2007 मध्ये लग्न केले. अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर ऐश्वर्या राय ही बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला डेट करत होती. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबतच्या लग्नानंतरही अभिनय सोडला नाही. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. रिपोर्टनुसार ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद सुरू आहे.
अभिषेक बच्चन याने एका शोमध्ये ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांच्याबद्दल मोठा खुलासा केला. अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन हे करण जोहर याच्या शोमध्ये पोहोचले. यावेळी करण जोहर याने अभिषेक बच्चन याला विचारले की, तू जया बच्चन यांना जास्त घाबरतो की, ऐश्वर्या राय हिला जास्त घाबरतो.
यावर अभिषेक बच्चन हा म्हणाला, आई जया बच्चन यांना…अभिषेक बच्चन याला मध्येच थांबवत श्वेता बच्चन म्हणाली की, नाही अभिषेक हा ऐश्वर्या हिला जास्त घाबरतो. पुढे अभिषेक बच्चन म्हणाला की, माझ्या आई मधील आणि माझ्यामधील बॉन्ड मला आवडतो. अभिषेक बच्चन म्हणाला की, माझ्या आईला काही गोष्टी लवकर पसंत पडत नाहीत.
पुढे अभिषेक बच्चन याला विचारण्यात आले की, तुला ऐश्वर्या राय आणि तुझ्या नात्यामधील कोणत्या गोष्टी बदलायला आवडतील? यावर अभिषेक म्हणाला, काहीच नाही…कारण माझे आणि ऐश्वर्याचे नाते जसे आहे तसे ठिक आहे…विशेष म्हणजे ते नाते असे आहे ज्याची अगोदरपासून इच्छा होती. मात्र, अभिषेक बच्चन याचे हे बोलणे श्वेता बच्चन हिला अजिबात आवडले नाही.
श्वेता बच्चन लगेचच म्हणाली की, आईबद्दल बोलताना याने अजिबात विचार केला नाही, जे मनात आले ते बोलला. मात्र, पत्नीबद्दल बोलताना अभिषेक किती जास्त विचार करतोय. प्रत्येक गोष्ट विचार करून बोलत असल्याचे श्वेता बच्चन हिने म्हटले. तशी अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांची ही मुलाखत जुनीच आहे. मात्र, श्वेता बच्चन हिच्या या विधांनाची आता जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List