Crime News – विवाहबाह्य संबंधात पैश्यांवरून वाद, महिलेचा निर्घृण खून

Crime News – विवाहबाह्य संबंधात पैश्यांवरून वाद, महिलेचा निर्घृण खून

यवतमाळमध्ये एका महिलेचे एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. या महिलेचे आणि या व्यक्तीचे पैश्यांवरून वाद होत होते. यातूनच या महिलेचा खून झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यवतमाळच्या सोनुर्ली शिवारातील जंगलामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला. या महिलेच्या अंगावर जखमा होत्या. पोलिसांनी या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. महिलेचा खून झाल्याचे शवविच्छेदनातून निष्पण्ण झाले. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला तेव्हा त्यांना आरोपी सापडला.

मृत महिलेचे नाव आरती असल्याचे समोर आले. आरती आणि गणेश एका खासगी जिनींगमध्ये काम करत होते. आरतीचे लग्न झाले होते. तरी आरतीचे आणि गणेशचे विवाहबाह्य संबंध होते.  आरती सतत गणेशकडे पैसे मागायची. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. आरती पैशाच्या तगादा लावत असल्याने गणेश कंटाळला होता. शनिवारी आरतीने गणेशला भेटायला बोलावलं आणि त्याच्याकडे पाच हजार रुपये मागितले. पैसै दिले नाही तर पोलिसांकडे खोटी तक्रार करण्याची तिने धमकी दिली. तेव्हा रागाच्या भरात गणेशने आरतीवर चाकूने वार केले. त्यात आरतीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी गणेशला अटक केली आहे.

ठाणेदार सीताराम म्हेत्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते, स पो नी अजय वाढवे, अमोल मुडे, पो उप नी धनराज हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कौशल्यपूर्वक तपास करून अवघ्या 2 तासात आरोपीला अटक करून त्याला बेडया ठोकल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;