सेटवर अजय देवगणला अभिवादन केलं नाही म्हणून..; मोठ्या अभिनेत्याचा आरोप

सेटवर अजय देवगणला अभिवादन केलं नाही म्हणून..; मोठ्या अभिनेत्याचा आरोप

अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘सन ऑफ सरदार 2’ या चित्रपटाचं सध्या युकेमध्ये शूटिंग सुरू आहे. मात्र हा चित्रपट त्यातील कलाकारांमुळे चर्चेत आला आहे. आधी संजय दत्तने या चित्रपटातून माघार घेतली. त्यानंतर आता विजय राजला या चित्रपटातून काढून टाकल्याचं कळतंय. विजयला त्याच्या वागण्यामुळे, सततच्या मागण्यांमुळे आणि सहकार्य न केल्यामुळे चित्रपटातून काढून टाकल्याचं निर्माते कुमार मंगत यांनी सांगितलं होतं. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ते याविषयी व्यक्त झाले होते. मात्र निर्मात्यांचे हे आरोप अभिनेता विजय राजने फेटाळले आहेत. चित्रपटातून काढून टाकण्यामागचं वेगळंच आणि सर्वांना थक्क करणारं कारण त्याने सांगितलं आहे.

काय म्हणाले निर्माते?

विजयला काढण्यामागचं कारण सांगताना निर्माते मंगत म्हणाले, “होय, विजय राजला त्याच्या स्वभावामुळे आम्ही चित्रपटातून काढून टाकल्याची बातमी खरी आहे. त्याला राहायला मोठे रुम्स, व्हॅनिटी व्हॅन हवी होती. त्याने स्पॉट बॉइजसाठीही आमच्याकडून जास्त पैसे घेतले होते. त्याच्या स्पॉटबॉयला एका रात्रीसाठी 20 हजार रुपये मिळत होते. कोणत्याही मोठ्या अभिनेत्याच्या स्पॉटबॉयला इतके पैसे दिले जात नाहीत. युकेतील शूटिंगचा खर्च अधिक असतो. शूटदरम्यान प्रत्येकाला चांगले रुम्स दिले गेले होते. पण त्याने ‘प्रीमिअर सुइट’ देण्याची मागणी केली. त्याचं सतत हेच म्हणणं होतं की तुम्ही मला भूमिका दिली आहे. मी तुमच्याकडे काम मागितलं नव्हतं. दिवसेंदिवस त्याचं वर्तन आणखी उद्धट झालं होतं. तीन जणांसाठी त्याने दोन कार मागितले होते.”

विजय राजची बाजू काय?

विजय राजने निर्मात्यांचे हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तो म्हणाला, “मी लोकेशनला वेळेच्या आधीच पोहोचलो होतो. तिथे मला भेटायला रवी किशन, कार्यकारी निर्माते आशिष, निर्माते कुमार मंगत आणि दिग्दर्शक विजय अरोरा आले होते. मी व्हॅनमधून बाहेर पडलो आणि अजय देवगणला पाहिलं. माझ्यापासून तो जवळपास 25 मीटर अंतरावर उभा होता. तो व्यस्त असल्याने मी त्याला अभिवादन केलं नव्हतं. त्याच्या पंचवीस मिनिटांनंतर निर्माते मंगत माझ्याजवळ आले आणि म्हणाले, ‘तुम्ही हा चित्रपट सोडू शकता. आम्ही तुम्हाला काढून टाकतोय.'” विजयला जेव्हा त्याच्या मागण्यांविषयी विचारलं गेलं, तेव्हा तो म्हणाला, “मला सकाळी योगसाधनेसाठी थोडीशी जागा हवी असते. या इंडस्ट्रीत 26 वर्षे काम केल्यानंतर मी मोठ्या रुमची मागणी करू शकत नाही का? माझ्याकडून झालेलं एकमेव गैरवर्तन म्हणजे मी अजय देवगणला अभिवादन केलं नाही. सेटवर पोहोचल्यानंतर तीस मिनिटांच्या आत मला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं. यामागचं कारण म्हणजे मी अजय देवगणची भेट घेतली नाही. ही लोकं खूप पॉवरफुल आहेत आणि गैरवर्तनाचा इथे प्रश्नच येत नाही.”

निर्माते कुमार मंगत यांना मात्र विजयने दिलेलं स्पष्टीकरण पटलं नाही. “विजय राज यांना चित्रपटातून काढून टाकल्याने आमचं दोन कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. अशा छोट्याशा कारणांसाठी आम्ही इतका मोठा निर्णय घेणार नाही. त्याचं वर्तन चुकीचं होतं”, असं ते म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;