रेखा यांचं मोठं वक्तव्य, ‘मी तिघांसोबत लग्न केलंय, म्हणून…’, चाहत्यांमध्ये खळबळ

रेखा यांचं मोठं वक्तव्य, ‘मी तिघांसोबत लग्न केलंय, म्हणून…’, चाहत्यांमध्ये खळबळ

बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आज अभिनय विश्वात सक्रिय नसल्या तरी खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. रेखा यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. रेखा वयाच्या 69 व्या वर्षी देखील एकट्या राहातात. पण एक काळ असा होता जेव्हा रेखा यांच्या मागे चाहत्यांची रांग लागलेली असायची. रेखा त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्या, पण खासगी आयुष्यात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला.

रेखा आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल कोणाला माहिती असं कोणीही नाही. पण बिग बी तेव्हा विवाहीत होते. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी कुटुंबासाठी प्रेमाचा त्याग केला. रेखा यांनी अनेकदा प्रेम व्यक्त केलं. पण अमिताभ बच्चन यांनी कधीच रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर वक्तव्य केलं नाही.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रेखा यांनी करोडपती उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर फार काळ दोघे एकत्र राहिले नाहीत. 1990 मध्ये मुकेश आणि रेखा यांचं लग्न झालं. पण लग्नाच्या सात महिन्यात रेखा यांच्या पतीने स्वतःला संपवलं. रिपोर्टनुसार, लग्नाच्या तीन महिन्यात रेखा यांनी मुकेश यांच्यापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. पण पतीच्या निधनानंतर रेखा यांनी अनेकांच्या टीकेचा सामना करावा लागला.

अविवाहित असताना विवाहित महिलेसारखं आयुष्य जगतात रेखा…

भारतीय संस्कृतीमध्ये पतीच्या निधनानंतर सिंदुर लावत नाहीत. पण कोणत्याही कार्यक्रमात रेखा यांच्या सिंदुरकडे सर्वांचं लक्ष वेधलं जातं. यावर एका मुलाखतीत रेखा यांनी मोठं वक्तव्य देखील केलं होतं. शिवाय दुसऱ्या लग्नाबद्दल देखील रेखा म्हणाल्या होत्या…. ‘मुकेश यांचं निधन झालं आहे, आता दुसऱ्या लग्नाचा काय विचार आहे?’ यावर रेखा यांनी लक्षवेधी उत्तर दिलं.

रेखा म्हणाल्या, ‘कोणत्या पुरुषासोबत तर दुसरं लग्न कधीच करणार नाही… पती शिवाय मी तीन गोष्टींसोबत लग्न केलं आहे. मी स्वतःसोबत, मझ्या कामासोबत आणि माझ्या चाहत्यांसोबत मनात लग्न केलं आहे. मी विवाहित आहे… लग्नासाठी कोणत्या पुरुषाची गरज नाही. प्रत्येक महिला स्वतःचं रक्षण करु शकते…’ असं देखील रेखा एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;