गद्दार आणि भाजपला हटवणे हेच टार्गेट! शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक

गद्दार आणि भाजपला हटवणे हेच टार्गेट! शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक

‘गद्दार आणि भाजपला हटवणे हेच टार्गेट आहे. ते हटले तरच आमचा मुख्यमंत्री होईल. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच महाराष्ट्राला सक्षम नेतृत्व देऊ शकते,’ असे मत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे. पंढरपूर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत दानवे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दानवे म्हणाले, ‘भाजपबरोबर युती नसताना आमच्या जास्त जागा निवडून आल्या होत्या. एकटे लढल्यावर जास्त जागा निवडून येतात, हा अनुभव आहे. परंतु आता जागावाटप हा मोठा विषय नाही. राज्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेतृत्व हवे,’ असे त्यांनी सांगितले.

भाजप देशाला, महाराष्ट्राला लुटतोय

‘भारतीय जनता पक्ष देशाला आणि महाराष्ट्राला लुटत असून, राज्याला अधोगतीकडे नेत आहे. याला गद्दार आमदारही हातभार लावत आहेत. त्यामुळे यांना महाराष्ट्रातून हटवणे हेच महत्त्वाचे आहे,’ असे अंबादास दानवे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;