अयोध्येत दिवे लागलेच नाही, घोटाळा लपविण्यासाठी चोरीची तक्रार; सपाचा खळबळजनक आरोप

अयोध्येत दिवे लागलेच नाही, घोटाळा लपविण्यासाठी चोरीची तक्रार; सपाचा खळबळजनक आरोप

अयोध्येत रामपथ येथे पावसाचे पाणी साचल्यानंतर कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर आता परिसर उजळून दिसावा यासाठी हजारो दिवे लावल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसात हे दिवे चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली. यानंतर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी टीका केली. यानंतर अयोध्येला बदनाम करण्याचा डाव असल्याचे यादव म्हणाले.

या प्राधिकरणाचे उपाध्यक्ष अश्विनी पांडे म्हणाले की, कंपनीच्या दाव्यात तथ्य नसून, आम्ही आमच्या स्तरावर पडताळणी करून घेतली. कंपनीने केवळ 2600 दिवे बसवले. यासाठी त्यांना 23 लाख 35 हजार रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय 96 गोबो प्रोजेक्टर लाइटसाठी एकूण 38 लाख 74 हजार रुपये अदा करण्यात आले आहेत.

कंपनीने 6400 दिवे लावल्याचा दावा करत 3800 दिवे चोरी गेल्याचे कळविले. त्यांनी दिव्यांशी संबंधित कागदपत्रे मागितली होती, पण दिली नाहीत. किती दिवे लावले याचीही माहिती मागवली होती, मात्र कंपनीने ती दिली नाही.

यानंतर मे महिन्यापासून कंपनीने चोरीचे बहाणे सुरू केले. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. ऑनलाइन एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा एफआयआर पूर्णपणे खोटा आहे. आम्ही कंपनीविरोधात तक्रारही दाखल केली आहे, गुन्हा दाखल केला जाईल.

या संपूर्ण प्रकरणावर अयोध्येचे विभागीय आयुक्त आणि विकास प्राधिकरणाचे प्रमुख गौरव दयाल यांनी सांगितले की, कंपनीच्या कंत्राटदारांनी सरकारचा विश्वासघात केला आहे. जेवढे दिवे बसवल्याचा दावा करत आहेत, तेवढे दिवे त्यांनी लावलेले नाहीत. आता कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;