मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाइन कार्यक्रमाचा फज्जा, कोल्हापुरात ‘लाडक्या बहिणीं’नी फिरवली पाठ

मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाइन कार्यक्रमाचा फज्जा, कोल्हापुरात ‘लाडक्या बहिणीं’नी फिरवली पाठ

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याचे दावे केले जात असतानाच, आज ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना, कोल्हापुरात रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच, जमलेल्या महिलांनी काढता पाय घेतला. त्यामुळे मोठ्या स्क्रीनवर मुख्यमंत्री भाषण ठोकत असताना समोर ऐकायला कोणीच नसल्याचे चित्र दिसून आले.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा पुण्यात शुभारंभ झाला. कोल्हापुरात मार्केट यार्ड परिसरातील सभागृहात मोठ्या स्क्रीनवर हा कार्यक्रम दाखविण्याचे आयोजन केले होते. यासाठी जिह्यातून महिलांना गोळा करण्यात आले होते. मात्र, सकाळी 9 वाजता होणारा हा कार्यक्रम दुपारी दीडनंतर सुरू झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण सुरू सुरू असताना, महिलांनी सभागृहातून काढता पाय घेतला. त्यामुळे बहुतांशी मोकळ्या खुर्च्यांसमोर स्क्रीनवर मुख्यमंत्री भाषण करत असल्याचे चित्र दिसत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;