सातारा जिह्याला धुवाँधार पावसाने झोडपले

सातारा जिह्याला धुवाँधार पावसाने झोडपले

जीवघेण्या उकाड्याने उकडून निघालेल्या सातारा जिह्याला आज पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सातारा, कराड, कोरेगाव, खटाव तालुक्यांसह जिह्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे लोकांची चांगलीच त्रेथातिरपीट उडाली. उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला.

मान्सूनच्या पावसाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून जवळपास 15-20 दिवस जिह्यात तुफान धुमाकूळ घातल्यानंतर गेल्या चार-पाच दिवसांत उघडीप मिळाली होती. गेल्या तीन-चार दिवसांत उन्हाचा चटका कमालीचा जाणवत होता. जिह्यात कमी-अधिक प्रमाणात सर्वच तालुक्यांत सकाळपासून ढगाळ वातावरण होते. हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा वाढल्याने लोक हैराण झाले होते. दुपारनंतर जिह्याला विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपून काढले. सातारा, कराड, कोरेगाव, खटाव, माण तालुक्यांसह जिह्यात विविध ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. या पावसाने सर्वत्र चांगलीच दाणादाण उडाली. ठिकठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने त्यातून मार्ग काढताना लोकांना कसरत करावी लागली.

नगरमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय

नगरसह जिह्यातील अनेक भागांत पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. नगर शहर व परिसरात आज दुपारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच हवामान विभागाकडून नगरसह काही जिह्यांना तीन-चार दिवस ‘यलो अलर्ट’ दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूरच्या जिह्यांना वादळी वाऱ्यांसह मध्यम पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नगर आणि जळगाव या जिह्यांना हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. मध्यंतरी पावसाने खंड दिल्याने तापमानात वाढ झाली होती. आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;