म्हाडा व झोपुतील घरे देण्याच्या बहाण्याने फसवणूक, गंडा घालणाऱ्या टोळीचा म्होरक्या गजाआड; साथीदारालाही अटक

म्हाडा व झोपुतील घरे देण्याच्या बहाण्याने फसवणूक, गंडा घालणाऱ्या टोळीचा म्होरक्या गजाआड; साथीदारालाही अटक

म्हाडा व झोपु योजनेतील काही सदनिका विकायच्या आहेत. दोन्ही विभागांचे अधिकारी आपले एकदम खास आहेत. त्यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये तुम्ही स्वतःचे घर घेऊ शकता, अशाप्रकारची चालबाजी करून पद्धतशीर जाहिरातबाजी करून बनावट कागदपत्रे दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालून पसार झालेला भामटा अखेर नेहरू नगर पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याच्या साथीदारालाही बेड्या ठोकल्या.

प्रीतम ओसवाल असे त्या भामट्याचे नाव आहे. ओसवाल तसेच त्याच्या टोळीतल्या संतोष दळवी, सिंग व इम्रान या चौघांनी गतवर्षी एका तरुणाला म्हाडामधून स्वस्तात सदनिका मिळवून देतो असे खोटे सांगून तसेच विश्वास बसावा याकरिता घराची बोगस कागदपत्रे दाखवून 7 लाख 56 हजार रुपयांचा गंडा घातला होता. याप्रकरणी त्या तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून या चौघांविरोधात कुर्ल्याच्या नेहरू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा प्रकारचे अन्य दोन गुन्हेदेखील दाखल झाले होते. पैसे घेतल्यापासून चौघेही आरोपी पसार झाले होते.

मोबाईल व ठावठिकाणा बदलून ते राहत असल्याने त्यांना शोधणे जिकिरीचे झाले होते. अखेर वरिष्ठ निरीक्षक युसूफ सौदागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शाहिन देसाई तसेच गणेश उगले, सूर्यवंशी, कसबे, तुषार आणि वानखेडे हे पथक शोध घेत असताना कमी किंमतीत घर देण्याच्या बहाण्याने नागरिकांना फसविणाऱ्या टोळीचा म्होरक्या प्रीतम ओसवाल हा कर्जतमध्ये सापडला. तो हाती लागल्यानंतर सिंग याला बेड्या ठोकण्यात आल्या. चौकशीत या आरोपींनी नेहरूनगर, एमआयडीसी, बोरीवली आदी ठिकाणी 15 हून अधिक लोकांची घराच्या नावाने फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. त्यांचे अन्य दोन साथीदार दळवी व इम्रान यांचा शोध सुरू आहे.

अशी करतात बनवाबनवी…

सिंग हा इस्टेट दलालाचे काम करतो. त्याचे म्हाडातील काही अधिकारी ओळखीचे असल्याने त्यांच्या माध्यमातून कुठे म्हाडा तसेच झोपु योजनेतील सदनिका आहेत त्याची माहिती तो घेतो. मग त्या सदनिकांचे फोटो काढून ते ओसवालला देतो. ओसवाल 90 एकर्स डॉट कॉम तसेच प्रसारमाध्यमांद्वारे सदरच्या सदनिका कमी किंमतीत विकत मिळतील अशी जाहिरातबाजी करतो. ती जाहिरात पाहून कोणी घर घेण्यास इच्छा व्यक्त केल्यास दळवी व सिंग स्वतः अधिकारी म्हणून सामोरे जायचे व सदनिकेचे बोगस म्हाडाचे कागदपत्र संबंधितांना दाखवतात. मग ओसवाल मध्यस्ती असल्याचे भासवून नागरिकांकडून पैसा घ्यायचा. मग ते सर्व आपापसात पैसे वाटून घ्यायचे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;