Yavatmal News – लाचखोर लिपिकाचा कारनामा; मृत्युच्या दाखल्यासाठी पैशांची मागणी, व्हिडिओ व्हायरल
>>प्रसाद नायगावकर
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तहसील येथे मृत्यू नोंद दाखल्यासाठी लिपिकाने पैशांची मागणी केली. तक्रारदाराने या लिपिकाचे स्टिंग ऑपरेशन केले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून महसूल विभागाने याची दखल घेत लिपिकाला तत्काळ निलंबित केले आहे .
बाळू पवार असं या लाचखोर लिपिकाचे नाव आहे. बाळू हा जन्म मृत्यू विभागातील सेतू येथे कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी गजानन तोडक यांनी पुसद तहसिल कार्यालयात वडिलांच्या मृत्यूची नोंद करण्यासाठी रीतसर अर्ज सादर केला. तुकाराम तोडक यांचे वडील तुकाराम यांचा मृत्यू 29 फेब्रुवारी 1974 ला झाला होता. काही कारणास्तव त्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली नाही. मात्र आता कामासाठी गजानन यांना आपल्या वडिलांच्या मृत्यू नोंद दाखल्याची आवश्यकता होती. वारंवार विनंती करूनही बाळू पवार हा लिपिक दाखला देत नव्हता. शेवटी कंटाळून गजानन यांनी या लाचखोर लिपिकाचे कामासाठी पैसे मागण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.
गजानन यांनी हा व्हिडिओ पुसद तहसीलदार महादेव जोरवार यांना दाखविला. तहसीलदार महादेव जोरवार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बाळू यांच्या निलंबनाचा प्रस्ताव महसूल विभागास पाठवला आणि बाळू यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List