अटल सेतूवर महिलेला वाचवणाऱ्या देवदूतांचा मिलिंद नार्वेकर यांच्याकडून सन्मान

अटल सेतूवर महिलेला वाचवणाऱ्या देवदूतांचा मिलिंद नार्वेकर यांच्याकडून सन्मान

नैराश्येतून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी सायंकाळी अटल सेतूवरून उडी घेणाऱ्या महिलेला वाचवण्यात आले. कॅब चालक, वाहतूक पोलीस कर्मचारी आणि नियंत्रण कक्षाचे कर्मचारी देवदूत बनून वेळीच धावले आणि जीवाची बाजी लावून महिलेला वाचवले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर यांनी अटल सेतूच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन बचाव पथकाला प्रोत्साहन देत त्यांचे कौतुक केले. तसेच कॅब चालक आणि वाहतूक पोलिसांचा सन्मानही केला.

महिलेला वाचवणारे कॅब चालक संजय यादव, वाहतूक पोलीस कर्मचारी किरण म्हात्रे, ललित शिरसाट, यश सोनवणे, मयूर पाटील, नियंत्रण कक्षाचे किशोर कुटे यांचा श्री सिद्धिविनायकाची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनीही बचाव पथकाच्या शौर्याचे कौतुक केले आहे.

मुलुंड येथे राहणारी रीमा मुकेश पटेल ही महिला शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कॅबने अटल सेतूवर गेली. यानंतर तिने पुलावर मध्येच कॅब रोखण्यास सांगितले. यानंतर महिला रेलिंगवरून पुलाच्या कठड्यावर बसली. सेतूवरील सीसीटीव्हीमुळे नियंत्रण कक्षाल तात्काळ ही बाब दिसली आणि बचाव पथकाला घटनास्थळी पाचारण केले.

याचदरम्यान महिलेने पुलावरून समुद्रात उडी घेतली आणि त्याच क्षणी कॅब चालक संजय यादव याने तिचा हात पकडला. काही सेकंदात वाहतूक पोलिसांचे पथक तेथे पोहचले आणि रेलिंगवर चढून महिलेचा जीव वाचवला. महिलेला वाचवणाऱ्या कॅब चालक आणि पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;