VIDEO – मुलाच्या वाढदिवशी संजय गायकवाड यांनी तलवारीने भरवला सर्वांना केक
मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड याच्या वाढदिवशी त्याने तलवारीने केक कापला. त्यानंतर संजय गायकवाड यांनी त्या तलवारीनेच केकचा तुकडा उचलून मुलाला व इतर कार्यकर्त्यांना केक भरवला. या घटनेचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मृत्युंजय गायकवाड याचा वाढदिवस सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील जयस्तंभ चौकात आयोजित करण्यात आला होता. या वाढदिवसाच्या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
वाढदिवसाला मृत्युंजय गायकवाड यांनी केक कापल्यानंतर संजय गायकवाड यांनी तलवारीने केकचा तुकडा कापला व त्यानंतर तो तुकडा तलवारीनेच सर्वांना भरवला. सार्वजनिक ठिकाणी तलवारीचा वापर करणे कायद्याचे उल्लंघन असल्याने या प्रकरणी तक्रार दाखल करावी अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List