नगरमध्ये मुसळधार पाऊस, जेसीबीच्या साहाय्याने लोकांना बाहेर काढले

नगरमध्ये मुसळधार पाऊस, जेसीबीच्या साहाय्याने लोकांना बाहेर काढले

नगर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी शनिवारी पहाटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे साकत परिसरातील नदी, ओढ्यांनी रौद्र रूप धारण केले होते. यामुळे अनेक वाड्या व वस्त्यांचा संपर्क तुटला होता. तसेच शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. साकत कोल्हेवाडी कडभनवाडी जोडणारा लेंडी नदीवर असलेला पुल आज झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेला यामुळे लोकांचा संपर्क तुटला होता. सकाळी आठ वाजता काही लोकांना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. तसेच अनेक विद्यार्थ्यांना परत माघारी जावे लागले.

परिसरात जून महिन्यांपासून पाऊस आहे. पेरणी जून मध्ये पेरणी झाली पण जूनपासून रोजच पाऊस आहे. फक्त आठ दिवस पावसाने खंड दिला. परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला यामुळे लेंडी नदीला पूर आल्यामुळे संपर्क तुटला होता. सकाळी पाणी थोडे कमी झाल्याने जेसीबीच्या साहाय्याने लोकांना पाण्याच्या पलीकडे सोडले यात अनेक दुधवाले व विद्यार्थी होते.

साकत कोल्हेवाडी मार्गावर साकत जवळ पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच वराट वस्ती, कडभनवाडी या ठिकाणचा संपर्क तुटला आहे. लेंडी नदी व वांजरा नदीला पुर आल्यामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला होता.

आज परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला यामुळे नदीला पूर आला होता यातच साकत जवळील लेंडी नदीवर पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. शालेय विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुलाची उंची वाढवावी अशी मागणी होत आहे.

आज पहाटे झालेल्या पावसामुळे नदीला पुर आला होता यातच कडभनवाडी, कोल्हेवाडी, वराट वस्ती, कवडवाडी परिसरातील नागरिक यांचा संपर्क तुटला होता. अनेक दुधवाले व विद्यार्थी अडकले होते. सकाळी आठ वाजता जेसीबीच्या साहाय्याने दुधवाले व काही नागरिकांना नदीच्या दुसऱ्या किनारी सोडले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;