Paithan news – पौष्टिक आहार म्हणून खाऊ घातली बिस्किटं; सव्वाशे विद्यार्थ्यांना विषबाधा, पालकांची रुग्णालयात धाव

Paithan news – पौष्टिक आहार म्हणून खाऊ घातली बिस्किटं; सव्वाशे विद्यार्थ्यांना विषबाधा, पालकांची रुग्णालयात धाव

पौष्टिक आहार म्हणून खाऊ घातलेल्या बिस्कीटांमधून जवळपास सव्वाशे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना पैठण तालुक्यातील केकत-जळगाव येथे घडली आहे. पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गात शिकणाऱ्या या चिमुकल्यांवर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केले जात आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पालक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

सकाळी 10.30 वाजता ही घटना घडली. जिल्हा परिषदेच्या या शाळेत एकूण 296 विद्यार्थी आहेत. दररोज विद्यार्थ्यांना खिचडी व पौष्टिक आहाराचे वाटप केले जाते. मात्र आज शनिवार असल्याने खिचडीऐवजी विद्यार्थ्यांना पारले कंपनीच्या बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. हे बिस्कीट खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने सुरुवातीला 50 ते 55 विद्यार्थ्यांना मळमळ व उलट्या झाल्या. थोड्याच वेळात हे विद्यार्थी तापाने फणफणले. यामुळे धाबे दणाणलेल्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, या विद्यार्थ्यावर उपचार सुरू असतानाच उलट्या आणि ताप आलेल्या आणखी 50 विद्यार्थ्यांची भर पडली. दुपारी 1 वाजेपर्यंत ही संख्या 122 एवढी झाली होती. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख नोमान व डॉ. बाबासाहेब घुगे उपचार करीत आहेत. तूर्तास या सर्वांची प्रकृती स्थिर असून काही घाबरण्याचे कारण नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

शेताच्या बांधवावर कामासाठी गेलेल्या तसेच बाहेरगावी असलेल्या पालकांना आपल्या मुलांना बिस्कीटांमधून विषबाधा झाल्याचे समजताच मोठी धावपळ उडाली. पालकांनी हातातील कामे अर्धवट सोडून ग्रामीण रुग्णालय गाठले. अनेकांनी संताप व्यक्त करीत शाळा प्रशासनाला दोषी धरत संताप व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा!

जिल्हा परिषदेच्या शाळेचे केंद्रप्रमुख भगवान फुंदे यांना विचारणा केली असता त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले. बिस्किटे खाल्ल्यावर विषबाधा झाली हे खरे आहे. 50 विद्यार्थी व 31 विद्यार्थिनींना उलट्या झाल्याने त्यांना पोचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. अनेकांना घरी सोडण्यात आले आहे, असे फुंदे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश लोखंडे यांनी दुपारी 2 वाजेपर्यंत पोचोड रुग्णालयात भेट दिली नव्हती. विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता चांगली आहे. त्यामुळे मी पैठण येथेच आहे, असे त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;