तो आला अन् त्यानं जिंकलं…; रितेश देशमुखच्या ‘भाऊचा धक्का’ने मोडले सर्व रेकॉर्ड्स

तो आला अन् त्यानं जिंकलं…; रितेश देशमुखच्या ‘भाऊचा धक्का’ने मोडले सर्व रेकॉर्ड्स

रितेश देशमुख… महाराष्ट्राचा लाडका दादा… ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचं रितेश सध्या सूत्रसंचालन करतोय. त्यानं त्याच्या शैलीने महाराष्ट्राची मनं जिंकली आहेत. ‘बिग बॉस मराठी’चं नवं पर्व रितेश देशमुख होस्ट करणार असल्याची घोषणा झाल्यापासून चाहते नव्या सीझनबद्दल खूप उत्सुक होते. ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियरचा मंच रितेश भाऊने दणाणून सोडला आहे. त्याची स्टाईल ‘बिग बॉस’प्रेमींच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. टीआरपी रेटिंगवर होत असलेल्या वर्षावाने याची कबुली दिली आहे. दर आठवड्याला रितेश बिग बॉसच्या घरातील सदस्यांशी ‘भाऊचा धक्का’वरून संवाद साधत असतो. कधी त्यांचं कौतुक करतो, तर कधी ओरडतो. त्याची ही स्टाईल प्रेक्षकांना आवडते आहे. कारण ‘भाऊच्या धक्क्या’ने तोडले सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत.

‘भाऊच्या धक्क्या’ ठरतोय लोकप्रिय

‘बिग बॉस मराठी’ च्या नव्या सीझनने इतिहास रचला आहे. मराठी मनोरंजनाचा बॉस असणाऱ्या या कार्यक्रमाच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने या आठवड्यात 3.2 TVR मिळवत टीआरपीचे सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत. शाळा, कॉलेज, ट्रेन, भाजीमार्केट कुठेही जा सर्वत्र फक्त ‘बिग बॉस मराठी’ आणि रितेश भाऊच्या कमाल होस्टिंगची चर्चा होताना दिसते. या नव्या सीझनच्या ग्रँड प्रीमियरने आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक करत 2.4 TVR मिळवला आहे. वीकेंडचं सरासरी रेटिंग 2.8 TVR आहे. त्यामुळे महाराष्ट्राला ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचं वेड लागल्याचंच या आकडेवारीवरून दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील ‘भाऊचा धक्का’ रितेश देशमुख चांगलाच गाजवत आहे. ‘भाऊच्या धक्क्या’वर सदस्यांची शाळा घेणं असो, आठवड्याभरातील सदस्यांच्या वागणुकीवर त्याने घेतलेली हजेरी असो किंवा आपल्या हटके स्टाईलने सदस्यांचं भरभरून केलेलं कौतुक असो… या साऱ्याच गोष्टी ‘बिग बॉस मराठी’चा प्रेक्षकवर्ग वाढवण्यात कारणीभूत ठरत आहेत. एक भाऊचा धक्का संपल्यावर दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावर काय होणार याची ‘बिग बॉस’ प्रेमींमध्ये असणारी उत्सुकता हेच या नव्या सीझनच्या यशाचं गुपित आहे. नव्या सिझनमधील नावीन्य आणि तरुणपण प्रेक्षकांना जास्त आकर्षित करत आहे.

रितेश काय म्हणाला?

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनच्या यशाबद्दल बोलताना रितेश देशमुखने प्रतिक्रिया दिली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या यशामध्ये आपल्या प्रेक्षकांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. रेटिंगचा चढता आलेख पाहणं खूपच सकारात्मक आणि प्रेरणादायी आहे. भाऊच्या धक्क्यासह सर्वच एपिसोडवर महाराष्ट्रभरातील प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे ऋणी आहोत. मला ही संधी दिल्याबद्दल कलर्स मराठी वाहिनीचे मी खूप आभारी आहे, असं रितेश म्हणाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;