हार्दिक पांड्या आणि गर्लफ्रेंड जास्मिन वालिया यांच्या वयात अंतर किती? फोटोंमुळे नात्याचं सत्य समोर

हार्दिक पांड्या आणि गर्लफ्रेंड जास्मिन वालिया यांच्या वयात अंतर किती? फोटोंमुळे नात्याचं सत्य समोर

Hardik Pandya and Jasmin Walia relationship: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या गोलंदाजी आणि फलंदाजीशिवाय त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. कायम स्वतःच्या हटके स्टाईलने चाहत्यांचं मन जिंकरणाऱ्या हार्दिक याने नुकताच पत्नी नताशा हिच्यासोबत घटस्फोट झाल्याची घोषणा केली. पत्नी मुलासह मायदेशी गेल्यानंतर हार्दिक याने सोशल माीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची घोषणा केली. एवढंच नाही तर, घटस्फोटानंतर काही दिवसांत हार्दिक याचं नाव अभिनेत्री आणि ब्रिटीश सिंगर जास्मिन वालिया हिच्यासोबत रंगली आहे.

जास्मिन ही हार्दिक याची नवी गर्लफ्रेंड आहे… असं देखील सांगितलं जात आहे. शिवाय जास्मिन हिने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत घोषणा केली नाही. पण दोघे एकमेकांना डेट करत आहेत… अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.

इन्स्टंट बॉलीवूड पेजने इन्स्टाग्रामवर जस्मिन वालियाचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये जास्मिन हिच्यासोबत कोणी दुसरं बसलं आहे. अभिनेत्रीच्या बाजूला असलेल्या व्यक्तीच्या हातावरील टॅटू हा हार्दिक पांड्याच्या हातावरील टॅटूशी जुळत असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

हार्दिक पांड्या आणि जास्मिन यांच्या वयातील अंतर

हार्दिक पांड्या याचा जन्म 11 ऑक्टोबर 1993 मध्ये झाला आहे. हार्दिक आता 30 वर्षांचा आहे. तर, जास्मिन वालिया हिचा जन्म 23 मे 1995 रोजी झाला आहे. अभिनेत्री आता 28 वर्षांची आहे. हार्दिक आणि जास्मिन यांच्यामध्ये 2 वर्षांचं अंतर आहे. हार्दिक पांड्या याची पहिली पत्नी नताशा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, 4 मार्च 1992 रोजी नताशा हिचा जन्म झाला. नताशा 32 वर्षांची आहे.

हार्दिक पांड्या – नताशा

हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. त्यांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. 2020 मध्ये हार्दिक – नताशा यांनी लग्न केलं. त्यानंतर नताशा हिने मुलाला जन्म दिला. पण मुलाच्या जन्माच्या 4 वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

घटस्फोटानंतर नताशा मुलासोबत तिच्या मायदेशी निघून गेली आहे. तिथे नताशा मुलासोबत अनेक ठिकाणी फिरताना दिसते. एवढंच नाही तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट देखील शेअर करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;