सांगलीत जुलैमध्ये 33 लाख महिलांचा एसटी प्रवास, प्रवासाचा विक्रम; एसटीच्या तिजोरीत भरघोस उत्पन्न

सांगलीत जुलैमध्ये 33 लाख महिलांचा एसटी प्रवास, प्रवासाचा विक्रम; एसटीच्या तिजोरीत भरघोस उत्पन्न

एसटी प्रवासात अर्ध्या तिकिटाची सवलत मिळाल्याने महिलांनी प्रवासाचा विक्रमच केला आहे. जिह्याच्या लोकसंख्येपेक्षा जास्त महिलांनी जुलै महिन्यात एसटी प्रवास करीत महामंडळाच्या तिजोरीत भरभरून उत्पन्न टाकले.

जुलै महिन्यात तब्बल 32 लाख 95 हजार 450 महिलांनी एसटी प्रवास केला आहे. महिला सन्मान योजनेतून त्यांना अर्ध्या तिकिटात प्रवासाचा लाभ महामंडळाने दिला आहे. जिह्यातील लोकसंख्या 31 लाख आहे. म्हणजे लोकसंख्येपेक्षा जास्त महिलांनी एसटीतून प्रवासाचा विक्रम केला आहे. याच काळात 2 लाख 65 हजार 422 ज्येष्ठ नागरिकांनी सवलतीच्या तिकिटात प्रवास केला, तर 75 वर्षांवरील 7 लाख 92 हजार 756 आजोबांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला.

एसटीतून प्रवासासाठी सवलत योजना जाहीर झाल्यापासून गर्दी वाढू लागली असून, महिलांचा प्रतिसाद भरभरून असल्याचे दिसत आहे. त्या अर्ध्या तिकिटात प्रवास करीत असल्या, तरी उर्वरित परतावा शासनाकडून मिळतो. त्यामुळे एसटीला फायदा होत आहे. शहरी बसलादेखील अर्ध्या तिकिटात प्रवासाची सुविधा लागू केल्याने महापालिका क्षेत्रातही महिलांचे भारमान वाढले आहे. त्याचा फटका वडाप वाहतुकीला बसत आहे.

उत्पन्नाचा  नवा विक्रम

n एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत तब्बल एक कोटी 33 लाख 57 हजार 530 महिलांनी एसटी प्रवास केला. एप्रिलमध्ये 31 लाख 32 हजार 566, मे महिन्यात 36 लाख 2 हजार 316, जूनमध्ये 33 लाख 27 हजार 198 महिलांनी एसटीतून प्रवास केला. त्यांच्या अर्ध्या तिकिटाच्या सवलतीपोटी शासनाकडून तब्बल 32 कोटी 80 लाख 59 हजार 299 रुपये मिळाले. उत्पन्नाचा हा एक विक्रमच ठरला आहे.

सांगली जिल्हाभरात महिला सन्मान योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, उत्पन्नातही वाढ झाली आहे. एप्रिलपासूनच्या चार महिन्यांत सव्वा कोटीहून महिलांनी एसटीतून प्रवास केला. त्याशिवाय अन्य सवलत योजनांनाही प्रतिसाद आहे. श्रावण महिन्यात विविध आगारांनी तीर्थक्षेत्री प्रवासाच्या योजना सुरू केल्या असून, प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा.

– वृषाली भोसले, विभागीय वाहतूक अधिकारी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;