Chandrapur News – चंद्रपुरात दूषित पाण्याचा दुसरा बळी, युवकाचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील गंगापूर गावात ताप, सर्दी, अतिसाराची साथ पसरल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. प्रशासनाने गावातील साथ आटोक्यात आल्याचे सांगितले होते. मात्र काल अतिसार व पोटदुखीने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील गंगापूर गावात काल घडली.
सुरज काशीनाथ मंढरे (21) असे मृत तरुणाचे नाव आहे. अतिसारानेच मुलाचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. गावात पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही, नदीतील गढूळ पाण्याने गावकरी तहान भागवितात. जुलै महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे गावालगत नदी-नाल्यांना पूर आला होता. सर्वत्र पाणी साचले होते. त्यानंतर नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नव्हते. या गावातील नागरिकांनी काही दिवसा अगोदर शुद्ध पाण्यासाठी आंदोलन केले होते. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या गावातील लोकांना आता विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List