प्रतिभावान लेखक, कवी, रंगकर्मी डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे निधन

प्रतिभावान लेखक, कवी, रंगकर्मी डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे निधन

वाईतील प्रतिथयश डॉक्टर, प्रतिभावान लेखक-कवी, अनुवादक, वक्ते, कथाकार, विज्ञानलेखक, रंगकर्मी डॉ. शंतनू शरद अभ्यंकर (वय 60) यांचे गुरुवारी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली त्यांची झुंज अखेर व्यर्थ ठरली. त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी, मुलगा व एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

डॉ. अभ्यंकर यांनी आयुष्यभर वैद्यकीय सेवा करता करता साहित्यसेवाही केली. लेखक, कवी, विज्ञान लेखक, प्रभावी वक्ता, रंगकर्मी अशा भूमिकांमध्ये ते लीलया वावरले. त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाची मोहिनी नेहमीच सर्वांवर राहिली.

गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी ते धीरोदात्तपणे लढत होते. गंभीर आजाराला शांतपणे तोंड देत अखेरपर्यंत ते आवडीच्या क्षेत्रात कार्यरत राहिले. सन 2022 मध्ये एका दिवाळी अंकात त्यांनी स्वतःला कॅन्सर डिटेक्ट झाल्याविषयी भावपूर्ण तरी तटस्थतेने लेख लिहिला होता. त्यातून अनेकांना जगण्याची प्रेरणा मिळाली.

अलीकडेच प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. तेथे गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल साहित्य, नाटय़, वैद्यकीय क्षेत्रांतील मान्यवरांसह वाईकरांनी हळहळ व्यक्त केली. डॉक्टरांच्या पार्थिवावर रात्री उशिरा वाई येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्याने स्वातंत्र्यदिनी जगाचा निरोप घेतला!

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खंदा पुरस्कर्ता स्वातंत्र्यदिनी निधन पावला, हा योगायोग म्हणायचा की काय म्हणायचे, काही समजत नाही. जीवन कसं जगावं, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजेच डॉ. शंतनू अभ्यंकर होय. त्यांची इच्छाशक्ती पाहाता हा पठ्ठय़ा निश्चितच कॅन्सरला मात देणार असे वाटत होते, अशा भावस्पर्शी शोकभावना डॉ. अभ्यंकर यांच्या निधनाबद्दल समाजमाध्यमांतून व्यक्त होत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;