‘आनंदाचा शिधा’चे कंत्राट देताना पक्षपात का केला?, हायकोर्टाने मिंधे सरकारचे कान उपटले

‘आनंदाचा शिधा’चे कंत्राट देताना पक्षपात का केला?, हायकोर्टाने मिंधे सरकारचे कान उपटले

‘आनंदाचा शिधा’च्या निविदेत अटींची पूर्तता करणाऱ्या कंपन्यांना अपात्र का ठरवले? कीट पुरवठ्याशी संबंध नसलेल्या जाचक अटी घालून पक्षपातीपणा का केला? असे प्रश्न करीत उच्च न्यायालयाने शुक्रवारी मिंधे सरकारचे कान उपटले. तसेच याचिकांतील आरोपांवर मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे खुलासा करण्याचे आदेश सरकारला दिले.

सर्व अटींची पूर्तता केली असतानाही ‘आनंदाचा शिधा’च्या निविदा प्रक्रियेत डावलले, असा दावा करीत इंडो अलाइड प्रोटीन फूड्स आणि जस्ट युनिव्हर्सल या कंपन्यांनी अ‍ॅड. ऋषिकेश केकाणे व अ‍ॅड. निखिल अदकिने यांच्यामार्फत याचिका केल्या आहेत. त्यांच्या याचिकांवर शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ‘आनंदाचा शिधा’च्या किट्सचे वितरण करण्याचा यापूर्वीचा अनुभव असतानाही सरकारने यंदा जाचक अटींच्या पूर्ततेची अपेक्षा बाळगून आपल्याला अपात्र ठरवले, असा दावा याचिकाकर्त्या कंपन्यांनी केला. याची दखल घेत खंडपीठाने मिंधे सरकारला नोटीस बजावली आणि मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे सविस्तर बाजू मांडण्याचे आदेश दिले. 22 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.

अनुभवी कंपन्यांना नाकारताच कसे?

सुनावणीवेळी खंडपीठाने सरकारवर प्रश्नांचा भडिमार केला. यापूर्वी ज्या कंपनीला कंत्राट दिले होते, त्या कंपनीला आता ‘आनंदाचा शिधा’च्या पुरवठ्याशी थेट संबंध नसलेल्या जाचक अटी घालून अपात्र कसे ठरवता? सर्वात जास्त अनुभव असलेल्या कंपनीला अनुभव नाही असे सांगून कंत्राट कसे काय नाकारता? सरकार मर्यादा ओलांडतेय, अशी संतप्त टिप्पणी मुख्य न्यायमूर्तींनी केली.

मनुष्यबळाच्या अटीवर चांगलेच फटकारले

300 कामगार उपलब्ध ठेवण्याच्या अटीवर न्यायालयाने सरकारला चांगलेच फटकारले. ही निविदा मनुष्यबळ पुरवण्यासाठी नाही. जिल्हा पातळीवर तुम्ही मनुष्यबळ पुरवू शकत नाही का? तुमच्याकडे यंत्रणा नाही का? जाचक अटी घालून पक्षपात का केला? याचे उत्तर द्या, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला बजावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;