बृजभूषण सिंहना पुन्हा धोबीपछाड, संजय सिंह यांच्या कुस्ती महासंघाचे कामकाज रोखले

बृजभूषण सिंहना पुन्हा धोबीपछाड, संजय सिंह यांच्या कुस्ती महासंघाचे कामकाज रोखले

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये वजन वाढल्याने पदरी निराशा पडलेल्या विनेश फोगाटसह अन्य कुस्तीपटूंनी न्यायालयीन लढाईमध्ये हिंदुस्थानी कुस्ती महासंघाला चितपट केले आहे. बृजभूषण सिंह यांनी महासंघाचे अध्यक्षपद सोडल्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांचे निकटवर्तीय संजय सिंह अध्यक्ष झाले होते. या निवडीविरुद्ध कुस्तीपटूंनी न्यायालयात दाद मागितली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल देताना या निवडणुकीचा निकाल रद्द ठरवला आहे. त्यामुळे संजय सिंह यांना महासंघाच्या अध्यक्षपदावर कायम राहता येणार नसल्याने हा बृजभूषण यांना सर्वात मोठा धक्का आहे. तसेच हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघटनेला (आयओए) अस्थायी समिती नेमण्यासही सांगितले आहे.

विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनियासह अन्य कुस्तीपटूंनी काही महिन्यांपूर्वी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केले होते. बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाईची मागणी खेळाडूंकडून करण्यात आली होती. त्यानंतर बृजभूषण यांनी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांनी संजय सिंह यांना अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरवले. या निवडणुकीत संजय सिंह विजयी झाले. ते बृजभूषण यांचेच निकटवर्तीय असल्यामुळे कुस्तीपटूंनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला.

संजय सिंह यांची कार्यकारिणी आता विघटित केली जाणार आहे. डिसेंबरमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या रद्द ठरवण्यात येत आहेत. त्यामुळे आता अस्थायी समिती कुस्तीबाबतचे यापुढील निर्णय घेईल, असे दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संजय सिंह यांना कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे.

कुस्ती महासंघ आव्हान देणार

कुस्तीपटूंच्या याचिकेवर निर्णय देताना दिल्ली उच्च न्यायालयाने हिंदुस्थानी कुस्ती महासंघाचे कामकाज रोखण्याचे आदेश दिल्यानंतर महासंघाने या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर जागतिक अजिंक्यपदाच्या यजमानपदावर संकट ओढावले आहे. याप्रकरणी कुस्ती महासंघ जागतिक कुस्ती महासंघ आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;