नाट्यसृष्टीतील सुवर्णकाळ छोट्या पडद्यावर, ‘प्र.ल.’ माहितीपट उद्या सह्याद्री वाहिनीवर

नाट्यसृष्टीतील सुवर्णकाळ छोट्या पडद्यावर, ‘प्र.ल.’ माहितीपट उद्या सह्याद्री वाहिनीवर

ज्येष्ठ नाट्यलेखक प्र. ल. मयेकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त समर्थ रंगभूमी निर्मित ‘प्र.ल.’ हा माहितीपट रविवार, 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे.

2016 मध्ये पत्रकार दुर्गेश आखाडे आणि समर्थ रंगभूमी रत्नागिरी यांनी ‘प्र.ल.’ माहितीपटाची निर्मिती केली. या माहितीपटाची संकल्पना आणि लेखन दुर्गेश आखाडे यांची आहे. माहितीपटाचे निवेदन अभिनेता अविनाश नारकर, प्रमोद पवार आणि अभिनेत्री मयुरा जोशी यांनी केले आहे, तर दिग्दर्शन श्रीकांत पाटील आणि दुर्गेश आखाडे यांनी केले आहे. छायाचित्रण अजय बाष्टे, संकलन धीरज पार्सेकर, पार्श्वसंगीत योगेश मांडवकर आणि ध्वनिमुद्रण उदयराज सावंत यांनी केले आहे.

माहितीपटाचे निर्माते श्रीकांत पाटील आहेत. ‘प्र.ल.’ या माहितीपटात ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर यांच्यासोबत काम केलेले अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळतात. त्यामध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहनी, अभिनेते अरुण नलावडे, चिन्मय मांडलेकर, निर्माते प्रसाद कांबळी, पटकथाकार कांचन नायक, ऐश्वर्या नारकर, शीतल शुक्ल, माधवी जुवेकर, डॉ. रवी बापट, पद्मश्री वाघ आणि विशाखा सहस्रबुद्धे यांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;