नाशिक बंदला हिंसक वळण;दोन गटांत दगडफेक, गाडय़ांची तोडफोड

नाशिक बंदला हिंसक वळण;दोन गटांत दगडफेक, गाडय़ांची तोडफोड

बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला नाशिकमध्ये हिंसक वळण लागले. सकल हिंदू समाजाने काढलेल्या रॅलीवेळी जुने नाशिकमधील पिंपळचौक, म्हसरूळ टेक, दूध बाजार परिसरात दगडफेक, वाहनांची तोडपह्ड करण्यात आली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला करीत अश्रूधुराच्या नळकांडय़ा पह्डल्या. या भागात सशस्त्र्ा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, तणावपूर्ण शांतता आहे.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाने आज शहरात बंद पुकारला होता. दुपारी रॅली जुने नाशिक परिसरात पोहोचली. तेथील पिंपळ चौक भागातील काही दुकाने बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर दोन गट समोरासमोर आले. दगडफेक करून सरकारी योजनेचे फलक फाडण्यात आले. एका भाजपा कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. यावेळी दगडफेकीत मारुती कार, बोलेरोसह दुचाकाRचे नुकसान झाले. दरम्यान, पोलीस पथकांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर तणाव निवळला. तोच जुने नाशिक येथील म्हसरूळ टेक भागात दोन गटांनी परस्परांवर दगड, तसेच काचेच्या बाटल्या फेकल्या. यात काहीजण जखमी झाले. घरे, दुकाने आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले. पोलिसांची अतिरिक्त कुमक, शीघ्र कृती दल घटनास्थळी दाखल झाले. अश्रूधुराच्या नळकांडय़ा पह्डून, लाठीचार्ज करून त्यांनी जमावाला पांगवले. बॅरिकेडींग करण्यात आले. सायंकाळी उशीरापर्यंत बंदोबस्त तैनात असल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

जळगावात मोर्चाला हिंसक वळण

बांगलादेशात हिंदूंवर होणाऱया अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने जळगाव बंद पुकारण्यात आला होता. या वेळी काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राम होंडा हे दुचाकीचे शोरूम उघडे असल्याचे पाहून जमावाने त्यावर दगडफेक केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;