स्टारबक्सच्या नव्या सीईओला राहायला घर, फिरायला कार, वर्क फ्रॉम होम; पगार 9,48,61,57,900 रुपये

स्टारबक्सच्या नव्या सीईओला राहायला घर, फिरायला कार, वर्क फ्रॉम होम; पगार 9,48,61,57,900 रुपये

स्टारबक्स या प्रसिद्ध कॉफी कंपनीने ब्रायन निकोल यांची नवे सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. हिंदुस्थानचे लक्ष्मण नरिसिम्हन यांनी राजीनामा दिल्यानंतर निकोल यांची कंपनीने नियुक्ती केली आहे. कंपनीने निकोल यांना वार्षिक पॅकेज म्हणून 113 मिलियन म्हणजेच तब्बल 948 कोटी रुपये ऑफर केले आहे. निकोल यांच्या पॅकेजमध्ये 1 कोटी डॉलर साइन ऑन बोनस आणि 7.5 कोटी डॉलर इक्विटी दिली आहे. तसेच आर्थिक वर्ष 2024-25 साठी 2.3 कोटी डॉलरचे अतिरिक्त वार्षिक अनुदानदेखील दिले जाणार आहे.

ब्रायन निकोल यांना वार्षिक पगार 16 लाख डॉलर दिला आहे. 36 लाख डॉलर ते 72 लाख डॉलरपर्यंत परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह दिले जाणार आहे. सॅलरी आणि इन्सेंटिव्ह त्यांच्या पॅकेजचा भाग आहे. ऑफर लेटरमध्ये युनिक अकोमोडेशनचाही उल्लेख आहे. नव्या सीईओला सर्व मिळून एकूण 113 मिलियन डॉलर म्हणजेच एकूण पगार 9,48,61,57,900 रुपये मिळणार आहे.

कार्यालयात येण्याची गरज नाही

निकोल यांच्यावर पैशांची खैरात करण्यात आल्यानंतर कंपनीने त्यांना कार्यालयात येणे सक्तीचे नाही, असे सांगितले. ते वर्क फ्रॉम होम करू शकतील. जर मीटिंगसाठी कार्यालयात यायचे असेल तर कंपनी त्यांच्यासाठी एक आलिशान कार आणि ड्रायव्हरचा खर्चसुद्धा कंपनी करणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;