वंचितला ‘गॅस सिलिंडर’ तर प्रहराला ‘बॅट’

वंचितला ‘गॅस सिलिंडर’ तर प्रहराला ‘बॅट’

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले असून वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलिंडर तर माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्षाला बॅट हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.

निवडणूक आयोगाने आज निवडणूक चिन्हाबाबतची घोषणा केली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना वेगवेगळ्या निवडणूक चिन्हावर लढावे लागले होते. पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना अकोला लोकसभा मतदारसंघात प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाले होते. त्यामुळे आंबेडकर यांनी मध्यंतरी नवी दिल्लीत जाऊन विधानसभा निवडणुकीला गॅस सिलिंडर हे निवडणूक चिन्ह देण्याची विनंती केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;