सरकार मराठ्यांचा अपमान करत आहे! मनोज जरांगे यांचा आरोप

राज्य सरकार ओबीसींच्या नेत्यांचे लांगूलचालन करून मराठा समाजाचा अपमान करत असल्याचा स्पष्ट आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मराठा समाजाशी चर्चा करूनच घेणार असल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारच्या आरक्षण धोरणावर कडाडून टीका केली. सत्ताधार्‍यांनी गोरगरीब मराठ्यांना डावलण्याचेच ठरवले आहे. सरकार ओबीसी नेत्यांची लाचारी करत असून मराठा समाजाचा अपमान करत आहे. याचे परिणाम सत्ताधार्‍यांना भोगावे लागतील असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. सध्या आम्ही फक्त मतदारसंघाचा आढावा आणि उमेदवारांबद्दलची माहिती घेत आहोत. २९ ऑगस्टनंतर प्रत्यक्ष उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील आणि त्यानंतर मराठा समाजाच्या व्यापक बैठकीत विधानसभा लढवण्याचा निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;