Mega Block – प्रवाशांचे हाल? मुंबईत पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रविवारी (18 ऑगस्ट 2024) सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अप आणि डाउन जलद मार्गांवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ब्लॉक कालावधीत सर्व जलद मार्गांवरील उपनगरीय गाड्या सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालवल्या जातील. तसेच ब्लॉक दरम्यान, काही उपनगरीय गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच काही अंधेरी आणि बोरिवली गाड्या हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवल्या जातील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List