‘बिग बॉस मराठी 5’तील सदस्य ढसाढसा रडले; का फुटला अश्रूंचा बांध?
'बिग बॉस मराठी'च्या घरात आज अश्रूंचा महापूर येणार आहे. भावनांच्या खेळात भावशून्य झालेले सर्व सदस्य घरच्यांसोबत फोनवर बोलताना भावनिक झालेलं पाहायला मिळणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात नेहमी हंगामा करणारे सदस्य भावूक झाल्याचं दिसत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात कधी कोण कोणाचा मित्र होईल आणि कोण कधी कोणाचा शत्रू होईल हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे सदस्यांना आपल्या कुटुंबीयांची आठवण येणं स्वाभाविक आहे.
'बिग बॉस मराठी'चा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळत आहे. घरच्यांना फोन लावताच सदस्य ढसाढसा रडताना दिसून येत आहेत.
प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत, "सदस्यांनी साधला जिवलगांसोबत आपुलकीचा संवाद." 'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग पाहताना 'बिग बॉस'प्रेमींनादेखील अश्रू अनावर होणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List