‘या’ अभिनेत्रींनी कमी वयात घेतला अखेरचा श्वास, एकीचा मृत्यू आजही एक रहस्य
काही दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खान याची ऑनस्क्रिन मुलगी सुहानी भटनागर हिचं निधन झालं. सुहानी हिने वयाच्या 19 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. अपघातानंतर सुहानी हिचं निधन झालंय.
अभिनेत्री दिव्या भारती हिचं निधन देखील फार कमी वयात झालं. तेव्हा अभिनेत्री फक्त 19 वर्षांची होती. घरातील बालकनीतून खाली पडल्यांमुळे अभिनेत्रीचं निधन झालं. पण अभिनेत्रीच्या मृत्यूबद्दल आजही अनेक चर्चा रंगलेल्या असतात.
अभिनेत्री जिया खान हिने देखील फार लवकर जगाचा निरोप घेतला. वयाच्या 25 व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. जियाच्या निधानानंतर देखील अनेक चर्चा रंगल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List