National Film Awards: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना बक्षिसाची रक्कम किती मिळते?
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली. कन्नड अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 'कांतारा' या चित्रपटासाठी त्याला पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचं स्वरुप रजत कमळ आणि दोन लाख रुपये असं असेल.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार दोन अभिनेत्रींमध्ये विभागला गेला आहे. 'तिरुचित्रांबलम' या तमिळ चित्रपटासाठी अभिनेत्री नित्या मेननला आणि 'कच्छ एक्स्प्रेस' या गुजराती चित्रपटासाठी अभिनेत्री मानसी पारेखला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यासाठी दोघींमध्ये रजत कमळ आणि दोन लाख रुपये बक्षिसाची रक्कम विभाजित होईल.
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार 'गुलमोहर'ला जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते स्टार इंडिया प्रायव्हेड लिमिटेड आणि दिग्दर्शक राहुल चित्तेला यांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि रजत कमळ देऊन सन्मानित करण्यात येईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List