ISRO ची यशस्वी झेप, EOS-08 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे प्रक्षेपण

ISRO ची यशस्वी झेप, EOS-08 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने शुक्रवारी सकाळी 9.17 वाजता आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अतंराळ क्रेंद्रातून SSLV (स्मॉल सेटलाइट लाँच व्हेइकल) च्या तिसऱ्या आणि अंतिम विकासात्मक EOS – 08चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

ISRO ने अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी याबाबत माहिती देत SSLV प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. या प्रेक्षपणामुळे इस्त्रो तंत्रज्ञान उद्योगाकडे प्रगतीचे पाऊल टाकत असल्याचे त्यांनी सांगितले.

EOS-08 हा उपग्रह आहे. हा उपग्रह यु. आर. राव सॅटेलाइट सेंटरमध्ये विकसित करण्यात आला आहे. या उपग्रहामध्ये तीन पेलोड आहेत. इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड पेलोड (EOIR), SAC ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम – रिफ्लेक्टोमेट्री पेलोड (GNSS-R), SAC आणि SiC UV Dosimeter, LEOS. या उपग्रहामध्ये नव्या प्रकारची प्रणाली असून, कम्युनिकेशन, बेसबँड, स्टोरेज आणि पोझिशनिंग पॅकेज, एम्बेडेड बॅटरी, Micro-DGA ( ड्युअल गिम्बल अँटिना), त्याचबरोबर सौर उर्जा आणि नॅनो स्टार सेन्सर, व ऑनबोर्ड तंत्रज्ञान प्रात्यक्षिकासारख्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

इस्त्रोचे उपग्रह संचालक एम. अविनाश यांच्यामते, EOS-08 उपग्रहामध्ये 20 वेगवेगळ्या नवीन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. यामध्ये डोसिमीटर पेलोड, रेडिएशन एक्सपोजर मोजण्याकरीता देखील साधन आहे, ज्याचा वापर गगनयान मोहिमेकरीता केला जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;