विधानसभेआधी भाजपला मोठा धक्का, माजी खासदार शिशुपाल पटले यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश!
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात भरघोस यश मिळाले. राज्याीतल 48 पैकी 31 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळाला. यामुळे राज्याच्या राजकारणाचे समिकरण बदलले असून महायुतीतील अनेक नेते महाविकास आघाडीची कास धरत आहेत. त्यातच विधानसभा निवडणूक तोंडावर असताना पूर्व विदर्भात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी खासदार शिशुपाल पटले यांनी भाजपचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांनी हात हातात घेतला.
शिशुपाल पटले हे मागील अनेक दिवसांपासून नाराज होते. अखेर 24 जुलै रोजी त्यांनी आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला. त्यानंतर आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्रातील दरोडेखोरांचं सरकार हटवण्यासाठी महाविकास आघाडी रणशिंग फुंकणार! – संजय राऊत
शिशुपाल पटले यांनी 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. पटले हे भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात पोवार समाजाचा मोठा चेहरा मानले जातात. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटले यांनी दिलेला राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भंडारा भाजपसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.
अजित पवारांना बारामतीतून लढण्यात रस नाही; संजय राऊत यांनी सांगितलं कारण
‘मी गेली अनेक वर्ष भाजपमध्ये काम केले. पण मी ज्या काळात भाजपसोबत जोडलो त्या काळातील भाजप आणि आताचा भाजप यात फार मोठा बदल झाला आहे. सत्तेचा धाक दाखवून, ईडीच्या कारवाया करवून पक्ष फोडण्याचा घृणास्पद प्रकार आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना योग्य वाटला नाही. विकासाची कामं बंद पाडून मतांसाठी योजना आणणे आणि धोरण आखणे हे योग्य वाटले नाही, त्यामुळे मी भाजपचा राजीनामा दिला. आता नाना पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला’, असे यावेळी शिशुपाल पटले म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List