एनर्जी, आरे सरिता स्टॉलवर सामंजस्याने तोडगा काढा! महाराष्ट्र दूध वितरक सेनेची मागणी 

एनर्जी, आरे सरिता स्टॉलवर सामंजस्याने तोडगा काढा! महाराष्ट्र दूध वितरक सेनेची मागणी 

मुंबईतील एनर्जी केंद्र क्रमांक 151 आणि आरे सरिता केंद्र 38 गेल्या 40 ते 50 वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक आणि मराठी माणसे चालवत आहेत. आरे स्टॉलधारक दूध, दुग्धजन्य पदार्थ व आरे सहउत्पादने विक्री करून उपजीविका करत आहेत. गेली अनेक वर्षे ते आपापल्या परिसरात व्यवसाय करत आहेत. मात्र त्यांनी पर्यायी ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे महापालिकेने कळवले आहे. अचानकपणे त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केल्यास त्यांचा पहिल्यासारखा व्यवसाय होणार नाही. त्यामुळे याबाबत सामंजस्याने तोडगा काढून या दोन्ही स्टॉलधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र दूध वितरक सेनेने दुग्ध व्यवसाय विभागाच्या आयुक्तांकडे केली आहे.

मुंबईत गेली अनेक वर्षं कार्यरत असलेल्या एनर्जी केंद्र क्रमांक 151 आणि आरे सरिता केंद्र 38 यांच्या केंद्रधारकांना पालिकेने 48 तासांच्या आत योग्य त्या पर्यायी जागेवर  केंद्र स्थलांतरित करण्यास सांगितले आहे. हे केंद्रचालक बृहन्मुंबई दूध योजनेच्या स्थापनेपासून केंद्रधारक म्हणून कार्यरत आहेत. आरे स्टॉल स्थलांतरित केल्यास वर्षानुवर्षांचा जमलेला उद्योग बंद होऊन आर्थिक नुकसान होणार आहे तसेच नवीन स्थलांतरित ठिकाणी आरे स्टॉलवर विद्युतपुरवठा नवीन घेणे आर्थिक तोटय़ाचे आहे. याबाबत महाराष्ट्र दूध वितरक सेनेने वरळी येथे दुग्ध व्यवसाय विभागाच्या आयुक्तांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. या वेळी संघटनेचे कार्याध्यक्ष राम कदम, विलास भुजबळ, तानाजी आरज आणि संबंधित केंद्रचालक उपस्थित होते. आयुक्तांनी याबाबत योग्य तो मार्ग काढण्याबाबत आश्वासित केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;