शिवसेनेकडून यशवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि टॅब

शिवसेनेकडून यशवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि टॅब

शिवडी विधानसभेच्या वतीने शिवसेना गटनेते विधिमंडळ गटनेते आमदार अजय चौधरी यांच्या विशेष सहकार्याने विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू सकपाळ, शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर, उपनेत्या किशोरी पेडणेकर, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, पराग चव्हाण, विधानसभा संघटक सुधीर साळवी, विधानसभा समन्वयक गौरी चौधरी, विधानसभा संघटक लता रहाटे, उपविभाग संघटक रूपाली चांदे, श्वेता राणे, विभाग संघटिका श्रद्धा जाधव, सहसंघटक वैभवी चव्हाण, दिव्या घाडीगावकर, माजी नगरसेविका सिंधू मसुरकर, माजी नगरसेवक अनिल कोकीळ, दत्ता पोंगडे, सचिन पडवळ, शाखाप्रमुख विजय इंदुलकर, मिनार नाटळकर, किरण तावडे, जयसिंह भोसले, हनुमंत हिंदोळे, शाखा संघटक शारदा बाने, भारती पेडणेकर, कांचन घाणेकर, कविता माने, शुभदा पाटील, सर्व शाखा समन्वयक, युवासेना पदाधिकारी उपशाखाप्रमुख, शिवसैनिक महिला कार्यकर्त्यां उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;