भाजपला महायुतीत नकोसे नवाब मलिक अजित पवार गटातच!
माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर असलेल्या आरोपांमुळे त्यांना महायुतीत सहभागी करून घेण्यास भाजपचा विरोध आहे, मात्र मलिक हे महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार गटातच असल्याचे नवाब मलिक यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या पोस्टमधून स्पष्ट झाले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कथित आरोपांवरून नवाब मलिक यांना तुरुंगात जावे लागले होते, मात्र ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली असल्याने मलिक काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक सत्ताधारी बाजूला बसल्याने भाजपने बराच आपंडतांडव केला होता. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पत्र धाडत मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध केला होता. दरम्यान, अजित पवार गटानेही मलिक यांना काहीसे दूरच ठेवले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List