कोटय़वधी ग्राहकांना स्वातंत्र्यदिनी जोरदार झटका, ‘एसबीआय’चे होम लोन महागले!

कोटय़वधी ग्राहकांना स्वातंत्र्यदिनी जोरदार झटका, ‘एसबीआय’चे होम लोन महागले!

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने स्वातंत्र्यदिनी आपल्या कोटय़वधी ग्राहकांना जोरदार झटका दिला. बँकेने गुरुवारी एमसीएलआरच्या दरात 10 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने आपल्या वेगवेगळ्या कालावधीत एमसीएलआरचे दर वाढवले असून ही नवी दरवाढ 15 ऑगस्ट 2024 पासून लागू करण्यात आली आहे. बँकेच्या या निर्णयामुळे एसबीआय ग्राहकांचे होम लोन, कार लोन आणि शैक्षणिक कर्ज महाग झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ओव्हर नाइट मार्जिनल कॉस्ट ऑफ लँडिंग रेट्समध्ये 10 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. त्यामुळे आता 8.10 टक्के वाढून 8.20 टक्क्यांवर पोहोचली आहे. एक महिन्याचा एमसीएलआर 8.35 टक्क्यांनी वाढून 8.45 टक्क्यांवर पोहोचला आहे. तीन महिन्यांचा एमसीएलआर 8.40 टक्क्यांनी वाढून 8.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. सहा महिन्यांचा एमसीएलआर 8.75 टक्क्यांनी वाढून 8.85 टक्क्यांवर पोहोचला आहे. एक वर्षाचा एमसीएलआर 8.85 टक्क्यांनी वाढून 8.95 टक्क्यांवर पोहोचला आहे.

जून 2024 पासून तिसऱ्यांदा वाढ

स्वस्त कर्ज मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कोटय़वधी ग्राहकांना एसबीआय जोरदार झटके देत आहे. बँकेने जून 2024 पासून आतापर्यंत तीन वेळा आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. तीन महिन्यांआधी 30 बेसिस पॉइंट्स वाढ केली होती. त्यामुळे ग्राहकांचा ईएमआय वाढत आहे.

या बँकांकडूनही एमसीएलआर दरात वाढ

एसबीआयसह कॅनरा बँक, यूको बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांनीसुद्धा आपल्या एमसीएलआरच्या दरात वाढ केली. कॅनरा बँकेने 5 बेसिस पॉइंट्स वाढ केली असून नवीन दर 12 ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत. यूको बँकेचे नवीन व्याजदर 10 ऑगस्टपासून, तर बँक ऑफ बडोदाचे नवीन दर 12 ऑगस्टपासून लागू झाले आहेत.

बँक ऑफ बडोदाने वाढवले एफडी व्याजदर

बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली. बँकेने आपल्या एफडी व्याजदरात वाढ केली. त्यामुळे आता ग्राहकांना 7.90 टक्के व्याजदर मिळणार आहे. 3 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर ग्राहकांना 4.25 टक्के ते 7.25 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकेल. 1 कोटी ते 3 कोटी रुपयांपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना 7.90 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. 7 ते 14 दिवसांसाठी सर्वसामान्य नागरिकांना 4.25 टक्के व्याज मिळेल, तर ज्येष्ठ नागरिकांना 4.75 टक्के व्याजदर मिळेल.

आणखी एका विम्याचे टेन्शन, बँकेतील जमा पैशांसाठी प्रीमियम भरावा लागणार

बँकेत आपल्याच खात्यात जमा पैशांच्या सुरक्षेसाठी लवकरच प्रीमियम भरावा लागू शकतो. त्यामुळे आपल्याच पैशांची लूट सुरू होण्याची शक्यता असून आणखी एका विम्याचे टेन्शन डोक्यावर राहणार आहे. डीआयसीजीसी अंतर्गत बँकेत जमा पैशांवर 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा आहे. म्हणजेच बँक दिवाळखोरीत गेल्यास किंवा बंद झाल्यास आपल्या खात्यात जमा पैशांवर 5 लाखांपर्यंतची नुकसान भरपाई मिळू शकते. ग्राहकांना हा विमा मोफत मिळतो, परंतु आता रिझर्व्ह बँकेने या विम्यावर प्रीमियम वसूल करण्याचे संकेत दिले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर स्वामीनाथन यांनी एका कार्यक्रमात बँक खात्यात जमा पैशांवर प्रीमियम आकारला जाऊ शकतो असे सांगितले. बँकेत जमा पैसेही जोखमीच्या व्यवहारात येतात. बँक दिवाळखोरीत निघाल्यास पैसे बुडतात. अनेक जण रस्त्यावर येतात. अशा वेळी त्यांना विमा संरक्षण मिळायला हवे. त्यादृष्टीने विचार सुरू असल्याचे ते म्हणाले. याअंतर्गत विम्यात आणखी योगदान मिळू शकणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;