ईडी सीबीआयपेक्षा मोठी यंत्रणा नाही! उच्च न्यायालयाचा निर्वाळा

ईडी सीबीआयपेक्षा मोठी यंत्रणा नाही!  उच्च न्यायालयाचा निर्वाळा

ईडी व सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांतील चढाओढीवर जम्मू-कश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. ईडी पुठल्याही दृष्टीने सीबीआयपेक्षा मोठी यंत्रणा नाही. ईडीला सीबीआयच्या निर्णयांचा सन्मान ठेवावाच लागेल. आर्थिक अफरातफरीव्यतिरिक्त इतर गुन्ह्यात ईडीला दुसऱ्या तपास यंत्रणांच्या निष्कर्षांचा स्वीकार करावाच लागेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील कथित अफरातफर केल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला व इतरांविरुद्ध पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करताना उच्च न्यायालयाने ईडीच्या अतिरेकी कारभाराला चाप लावला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रावर आपण स्वतंत्र विचार करू शकतो. तसेच आर्थिक अफरातफरीचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी स्वतंत्र निष्कर्ष काढू शकतो, असा युक्तिवाद ईडीतर्फे करण्यात आला होता. तथापि, न्यायमूर्ती संजीव पुमार यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ईडीचा हा युक्तिवाद धुडकावला. ईडी पुठल्याच दृष्टिकोनातून सीबीआयपेक्षा मोठी तपास यंत्रणा नाही. सीबीआयने केलेल्या चौकशीविरोधात ईडी अपील दाखल करू शकत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;