महाविकास आघाडीचा आज पदाधिकारी मेळावा; उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांचे प्रमुख मार्गदर्शन

महाविकास आघाडीचा आज पदाधिकारी मेळावा; उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांचे प्रमुख मार्गदर्शन

स्थळ – षण्मुखानंद सभागृह, माटुंगा
वेळ – सकाळी 10.30 वा.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला. आता विधानसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळ आले आहे. त्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवरच उद्या, माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आघाडीच्या पदाधिकाऱयांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.

महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या बैठका होत असतात. उद्या, आघाडीतील पक्षांच्या पदाधिकाऱयांचा पहिला संयुक्त मेळावा सकाळी ठीक साडेदहा वाजता षण्मुखानंदमध्ये होत आहे. लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभेतही आघाडीच्या विजयाचा आणि महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा निर्धार या मेळाव्यात केला जाणार आहे. त्यामुळे या मेळाव्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या मेळाव्यात काही महत्त्वाच्या घोषणा होणार असून पदाधिकाऱयांना जबाबदाऱयाही सोपवल्या जाणार असल्याचे सांगितले जाते.

या मेळाव्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांसह शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आदी घटक पक्षांचे नेते आणि पदाधिकारीही उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना नेते व पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी दिली.

आता मिशन महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकसंध राहून नियोजनबद्ध काम करत दणदणीत विजय मिळवला. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही करण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱयांना मार्गदर्शन करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;