सोनाक्षी सिन्हाच्या कन्यादानावेळी एकीकडे मंत्रांचे पठण तर दुसरीकडे अजान, अखेर झहीर इक्बाल याचा मोठा खुलासा, म्हणाला…

सोनाक्षी सिन्हाच्या कन्यादानावेळी एकीकडे मंत्रांचे पठण तर दुसरीकडे अजान, अखेर झहीर इक्बाल याचा मोठा खुलासा, म्हणाला…

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी सात वर्ष एकमेकांना डेट करून लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे अगदी खास पद्धतीने यांचा विवाहसोहळा पार पडला. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी सिव्हिल मॅरेज केले. विशेष म्हणजे सही करताना सोनाक्षी सिन्हा हिने वडील शत्रुघ्न सिन्हा यांचा हात देखील पकडला होता. सुरूवातीला सांगितले जात होते की, सोनाक्षी सिन्हा आणि झहीरच्या लग्नाला सिन्हा कुटुंबियांचा विरोध आहे. मात्र, लेकीच्या लग्नात शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा धमाल करताना दिसले. लग्न झाल्यापासून सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी सिन्हा दिसत आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये दोघेही आपल्या लग्नाबद्दल बोलताना दिसले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच कन्यादानावर बोलताना झहीर इक्बाल हा दिसला. सोनाक्षी सिन्हा हिचे कन्यादान सुरू असताना नेमके काय घडले हेच आता झहीर इक्बाल याने सोनाक्षी हिच्यासमोरच सांगितले आहे.

झहीर इक्बाल हा म्हणाला की, माझ्या मते आमच्या आयुष्यातील तो क्षण सर्वोत्तम होता. मुळात म्हणजे कन्यादानाला 15 मिनिटे उशीर झाला ठरलेल्या वेळेपेक्षा. कन्यादानासाठी आम्ही बसलो होतो. माझ्या हातामध्ये सोनाक्षीचा हात होता आणि आम्ही प्रार्थना करत होतो. अचानक सोना मला म्हणाली की, तुला काही ऐकू येत आहे का? 

मी सोनाला म्हणालो की, काय?…सोना मला म्हणाली की, अजान सुरू आहे…आणि तो क्षण अत्यंत सुंदर आणि खास होता. आमचे लग्न सुरू होते आणि पंडितजी मंत्र पठण करत होते…त्याचवेळी अजान देखील सुरू होती. माझ्यासाठी आणि सोनाक्षीसाठी खरोखरच तो क्षण खूप मोठा होता…त्यावेळी कन्यादानाची विधी सुरू होती.

आता झहीर इक्बाल याच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी लग्नानंतर एका मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या पार्टीला अनेक मोठे कलाकार पोहोचले होते. हेच नाही तर आपल्याच लग्नाच्या पार्टीमध्ये धमाकेदार डान्स करताना सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल दिसले होते, यांच्या लग्नाच्या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;