सावत्र आईच्या अंगात हडळ संचारली; सख्ख्या बापाचीही साथ मिळाली, दोघांनी मिळून 2 चिमुरडींची हत्या केली!

सावत्र आईच्या अंगात हडळ संचारली; सख्ख्या बापाचीही साथ मिळाली, दोघांनी मिळून 2 चिमुरडींची हत्या केली!

उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सावत्र आईने आणि बापाने पोटच्या मुलींना विष पाजून मारल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच एसपीसहित पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी याप्रकरणी महिलेसह तिच्या नवऱ्याला अटक केली आहे.

ही थरकाप उडवणारी घटना बिजनौर गावातील अकबरपुर तिगरी येथील आहे. जिथे नाजरीन आणि तिचा नवरा फरमानने हादिया (8) आणि आफिया (10) वर्षांच्या मुलींना विष पाजून कायमचे झोपवले. नाजरीन ही मृत मुलींची सावत्र आई होती. या घटनेबाबत गावात समजल्यानंतर एकच खळबळ उडाली. शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ फरमानच्या घराबाहेर जमा झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटना गंभीर असल्याने एसपी अभिषेक झा घटनास्थळी पोहोचले आणि मृत मुलींच्या बापाकडून संपूर्ण माहिती घेतली. बोलले जात आहे की, नाजरीन ही त्या दोन्ही मुलींची सावत्र आई होती. तर फरमान हा त्यांचा खरा बाप होता. फरमानने दोन वर्षांपूर्वी आपली पहिली पत्नी दिलशानाला तलाक देऊन नाजरीनशी दुसरा विवाह केला होता.

पहिली पत्नी दिलशानापासून फरमानला दोन मुली होत्या, नाजरीनला त्या आवडायच्या नाहीत. याच कारणामुळे मुली सावत्र आईकडे न राहता त्यांच्या आजोबांकडे राहायच्या. मात्र बुधवारी दोन्ही मुलं नाजरीकडे खेळायला आली होती. याच दरम्यान नाजरीन आणि फरमानने दोघींना विष पाजले. पोलिसांनी मृत मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. सोबत नाजरीन आणि फरमानला ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. तर दोन चिमुकलींच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;