वयाने 14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला डेट करण्याच्या चर्चांवर सुंबुलने सोडलं मौन; म्हणाली..
'ईमली' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुंबुल तौकीर नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. 20 वर्षीय सुंबुलचं नाव अनेकदा तिच्या सहकलाकारांशी जोडलं गेलंय. याआधी 'ईमली'तील सहकलाकार फहमानशी तिचं नाव जोडलं गेलं होतं. आता 'काव्या' या मालिकेतील सहकलाकार मिशकत वर्माला ती डेट करत असल्याची चर्चा आहे.
मिशकत आणि सुंबुल यांच्या वयात 14 वर्षांचं अंतर आहे. मात्र या दोघांनी ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री पाहून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना चाहते खरे मानत आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुंबुलने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
वयानुसार मी आणखी समजूतदार आणि मोठी झाली आहे. अशा चर्चांमुळे आधी मी खूप त्रस्त व्हायची. पण आता मी लोकांचा फार विचार करत नाही. तुम्ही स्वत:साठी सर्वकाही करत आहात, याचा विचार करा. लोकांचा विचार करू नका", असं ती म्हणाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List