स्वातंत्र्यामागे दीर्घ, कठीण संघर्ष..; अनुपम खेर यांच्यापासून कंगनापर्यंत, सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा

स्वातंत्र्यामागे दीर्घ, कठीण संघर्ष..; अनुपम खेर यांच्यापासून कंगनापर्यंत, सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा

देशभरात आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. यानिमित्त सोशल मीडियावर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट लिहित चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी या दिनानिमित्त खास संदेशसुद्धा दिला आहे. यात अभिनेते अनुपम खेर, अक्षय कुमार, मोहनलाल, प्रभू देवा, अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांचा समावेश आहे. ‘आज आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या भूतकाळातील अनेक ज्ञात आणि अज्ञात लोकांनी बलिदान दिलं आहे. ते लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे’, असं अनुपम खेर यांनी लिहिलंय. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओसुद्धा पोस्ट केला आहे.

‘स्वातंत्र्य हा एक शब्द नसून ती एक ओळख आहे. एक अशी ओळख ज्यामागे एक दीर्घ आणि कठीण संघर्ष आहे. एक असा संघर्ष जो आपल्या पूर्वजांनी जीव धोक्यात घालून लढला होता. हा लढा आपल्या अस्तित्वाचा लढा होता. हा लढा आपल्या स्वाभिमानाचा होता. मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी ती सर्व धडपड होती. ज्यामुळे आज आपल्याला अभिमानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे’, असं खेर यांनी म्हटलंय. या व्हिडीओमध्ये त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडसुद्धा दाखवलं आहे. देशातल्या जनतेनं जे अत्याचार सहन केले, तेसुद्धा या व्हिडीओत पहायला मिळतंय. यासोबतच बदलत्या भारताचं रुपही व्हिडीओत पहायला मिळतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनीसुद्धा झेंडा फडकावताचा फोटो पोस्ट करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय कुमारनेही तिरंग्यासोबत फोटो शेअर केला आहे. ‘आपला तिरंगा ध्वज सदैव उंच फडकत राहोल आणि आपलं हृदय नेहमी अभिमानाने भरलेलं असो. आपल्या स्वातंत्र्याला सलाम. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा’, असं अक्षयने लिहिलंय. ‘पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुननेही तिरंग्याचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनीही चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात मोहनलाल आणि प्रभू देवा यांचाही समावेश आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरनेही सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती तिच्या टीमसोबत गेट वे ऑफ इंडियासमोर डान्स परफॉर्म करताना दिसून येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;