80 कोटींचे हिरे आता 800 कोटींचे; ‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर

80 कोटींचे हिरे आता 800 कोटींचे; ‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर

तब्बल 19 वर्षांनंतर ‘नवरा माझा नवसाचा’ या सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे तर अभिनेता स्वप्नील जोशी ही जोडी सचिन-सुप्रिया यांच्या मुलगी-जावई अशा भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर या चित्रपटाची कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले आहे.

48 सेकंदाच्या या टीझरची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजने होते. ‘सरकारी तिजोरीतून हिरे घेऊन दोन चोर पळाले आहेत’, अशी बातमी टीव्हीवर पहायला मिळते. नंतर ट्रेनमधील प्रवासाची झलक दाखवण्यात आली आहे. नंतर स्वप्निल जोशी आणि हेमल इंगळे यांच्या लग्नाची बोलणी, त्यादरम्यान दोन्ही कुटुंबातील धमालमस्ती आणि दादर स्टेशनवरून होणाऱ्या प्रवासाची सुरुवात.. हे सर्वकाही या टीझरमध्ये पहायला मिळतं.

19 वर्षापूर्वी अल्पावधीतच हिट झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या एव्हरग्रीन सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर आता ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाचा सीक्वेल येणार हे जाहीर झाल्यापासूनच रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या 20 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एसटी बस प्रवासात ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे.

पहा टीझर-

‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाचे संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांना आवडतो. त्यामुळे आता ‘नवरा माझा नवसाचा 2’ मध्ये काय धमाल अनुभवायला मिळणार याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. हा मनोरंजक प्रवास अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना 20 सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;