‘आता मला बारामतीतून निवडणूक लढण्यात रस नाही’, अजित पवारांनी दिले मुलाला रिंगणात उतरवण्याचे संकेत

‘आता मला बारामतीतून निवडणूक लढण्यात रस नाही’, अजित पवारांनी दिले मुलाला रिंगणात उतरवण्याचे संकेत

लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधक झाली. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सुनेत्रा पवार तर शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांना तिकीट दिले होते. नणंद-भावजयच्या या लढतीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली, तर सुनेत्रा पवार यांना मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे समोर आले आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून मुलगा जय पवार यांना रिंगणात उरवण्याचे संकेत दिले आहेत. जय पवार यांच्या उमेदवारीची कार्यकर्त्यांकडून मागणी होत असेल तर त्याबाबत आमच्या पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेईल, असे अजित पवार म्हणाले.

महायुतीत विधानसभा जागा वाटपावरून कलगीतुरा; पिंपरी विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा

जय शहा यांच्या उमेदवारीची मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे. त्यामुळे बारामतीतून त्यांना उमेदवारी देणार का? असा सवाल केला असता अजित पवार म्हणाले की, ‘ठीक आहे, देऊया. शेवटी लोकशाही आहे. मला तर फार काही रस नाही. कारण मी 7-8 वेळा निवडणुका लढलो आहे. जनतेचा तसा कल असेल आणि कार्यकर्त्यांची मागणी असेल तर संसदीय मंडळाच्या बैठकीत जय पवार यांच्या उमेदवारीबाबत विचार केला जाईल.’

युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार सामना?

दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पाडली आणि आमदारांना घेऊन सत्तेची वाट निवडली. मिंधे सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले आणि अर्थमंत्री खातेही त्यांच्या वाट्याला आले. या फुटीनंतर अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारातही ते उतरले. लोकसभेच्या निलाकालानंतर ते अधिक जोमाने कामाला लागले आणि मतदारसंघ पिंजून काढू लागले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बारामती विधानसभा मतदारसंघात त्यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनीही जय पवार यांना मैदानात उतरवण्याचे संकेत दिल्याने आगामी निवडणुकीत युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार असा सामना पहायला मिळू शकतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;