ऑनलाईन मागवलं 30 हजारांचं घड्याळ, आधी पाठवलं सेकेंड हॅण्ड आणि नंतर…

ऑनलाईन मागवलं 30 हजारांचं घड्याळ, आधी पाठवलं सेकेंड हॅण्ड आणि नंतर…

ऑनलाईन साईटवरून आपण एखादी महागडी गोष्ट मागवतो आणि भलतीच वस्तू समोर आल्याच्या अनेक घटना वाचल्या असतील. असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे. एका व्यक्तीने अ‍ॅमेझॉनवरून 30 हजारांचे घड्याळ खरेदी केले. पण जेव्हा त्याने घड्याळाचा बॉक्स उघडला त्यावेळी त्याला धक्का बसला.

घड्याळाची डिलिव्हरी व्यक्तीच्या घरी मिळाली त्यावेळी त्याला धक्का बसला. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहून सर्व घडलेला प्रकार सांगितला. अ‍ॅमेझॉनने फसवणूक केली आहे. 21 जुलै रोजी अ‍ॅमेझॉन इंडियाकडून Tissot PRX हे घड्याळ ऑर्डर केले होते. त्याची डिलिव्हरी 28 जुलैला होती. त्यानंतर त्याने अ‍ॅमेझॉनच्या अधिकृत संकेतस्थळावर शहानिशा केली. त्यावेळी घटना उघड झाल्याचे त्याने त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे.

अ‍ॅमेझॉनच्या अधिकृत संकेतस्थळावर ज्यावेळी त्याने घड्याळाबाबत तपासले असता त्या घड्याळाला कोणीतरी 15 फेब्रुवारी 2023 रोजी खरेदी केले होते. जे एक वर्ष जुने होते. युजरने ही पोस्ट 13 ऑगस्ट रोजी शेअर केली होती आणि आतापर्यंत 4.9 मिलियन युजर्सनी ही पोस्ट पाहिली आहे. ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. युजरने हे घड्याळ ज्यावेळी रिप्लेस केले त्यावेळी त्याला अरमानी घड्याळ पाठवण्यात आले. त्यानंतर त्याने ही पोस्ट लिहिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;