महायुतीत विधानसभा जागा वाटपावरून कलगीतुरा; पिंपरी विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा

महायुतीत विधानसभा जागा वाटपावरून कलगीतुरा; पिंपरी विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा

महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाने चिंचवडवर दावा सांगितल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघ आम्हाला मिळावा, अशी मागणी केली आहे. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी चिंचवड आणि पिंपरीच्या जागेवरून महायुतीमध्ये कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे.

आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. शहरातील पिंपरी विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे, चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, तर भोसरीत भाजपचेच महेश लांडगे आमदार आहेत. महायुतीत ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला संबंधित विधानसभा मतदारसंघ सुटण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांनी पिंपरीसह चिंचवड विधानसभा मतदार राष्ट्रवादीला मिळावा, अशी मंगळवारी (13 ऑगस्ट) अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे चिंचवड मतदारसंघातील भाजपच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, ‘पिंपरी विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराला 16 हजार मतांचे लीड आहे. त्यामुळे आम्हाला हा मतदारसंघ मिळावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, महायुतीमध्ये जागा वाटपांचा जो काही फॉर्म्युला ठरेल, त्यानुसार आम्ही काम करू’, असेही जगताप म्हणाले.

मंत्रिमंडळ बैठकीत फाईलवरून मिंधे-दादा भिडले

होय आमच्यात ताळमेळ नाही

भोसरी विधानसभा मतदारसंघातील फ्लेक्सवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार महेश लांडगे यांचाच फोटो असतो. शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा फोटो नसतो. आमदार लांडगे हे प्रोटोकॉल पाळत नसून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. काळभोर यांच्या पत्राबाबत आपणास काहीही माहिती नसल्याचे शहराध्यक्ष जगताप यांनी सांगितले. तुमच्यामध्ये ताळमेळ नाही का, असे विचारल्यानंतर हो आमच्यात ताळमेळ नाही, असे उत्तर दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;