Stree 2 Review: हॉरर-कॉमेडीचा जबरदस्त तडका; कसा आहे श्रद्धा-राजकुमारचा ‘स्त्री 2’?

Stree 2 Review: हॉरर-कॉमेडीचा जबरदस्त तडका; कसा आहे श्रद्धा-राजकुमारचा ‘स्त्री 2’?

Stree 2 Review: दिनेश विजन आणि अमर कौशिक ही जोडी सहा वर्षांनंतर पुन्हा एकत्र आली आहे. ‘स्त्री’ या चित्रपटाचा सीक्वेल थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरची जोडी मोठ्या पडद्यावर धमाल करताना दिसणार आहे. 2018 मध्ये ‘स्त्री’चा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता सहा वर्षांनी त्याचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीक्वेलमध्ये भरभरून ट्विस्ट, सस्पेन्स आणि हॉरर आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने कथेविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये बघण्याचा प्लॅन करत असाल, तर आधी हा रिव्ह्यू वाचा.

कथा

चित्रपटाच्या पहिल्या भागात ‘स्त्री’ची दहशत पहायला मिळाली होती. आता दुसऱ्या भागात ‘सरकटे’ची दहशत पहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे या सीक्वेलची कथा नवीन आणि रंजक आहे. पण ती आणखी फुलवता आली असती. चित्रपटाच्या कथेची सुरुवात चंदेरी गावातून होते. गावकरी स्त्रीची पूजा करत असतात, पण सरकटेच्या एण्ट्रीने सर्वकाही उलथापालथ होते. चंदेरीच्या लोकांमध्ये पुन्हा एकदा भीती निर्माण होते. गावातून एक-एक मुली गायब होतात आणि त्यामागचं कारण वेगळं आहे, जे तुम्हाला चित्रपटात समजेल. सरकटेपासून वाचवण्याची जबाबदारी स्त्री म्हणजेच श्रद्धा कपूर घेते. यातच राजकुमार रावची प्रेमकहाणी फुलू लागते. या कथेच बरेच ट्विस्ट येतात, बरेच खुलासे होतात.

अभिनय

या चित्रपटात राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या भूमिका आहेत. या सर्वांनी दमदार अभिनय केला आहे. या सीक्वेलमध्ये श्रद्धा कपूर सर्वांत वरचढ ठरते. आपल्या जादूने ती सरकटेचा सामना करते. त्यात राजकुमार तिची साथ देतो. राजकुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा कॉमिक टायमिंग कमालीचा आहे. अभिषेकच्या भूमिकेनंही कमाल केली आहे. अपारशक्तीसुद्धा प्रेक्षकांना खळखळून हसवतो. याशिवाय चित्रपटात काही पाहुण्या कलाकारांच्या भूमिकाही आहेत.

दिग्दर्शन

‘स्त्री 2’चं दिग्दर्शन अमर कौशिकने केलं आहे. हॉररसोबत कॉमेडीचा डोस देण्यात त्याने कोणतीच कसर सोडली नाही. या चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत, जी तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडतील. तर काही अशीही दृश्ये आहेत, जे पाहून तुमची घाबरगुंडी उडेल. यातील संवाद मजेशीर आहेत आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससुद्धा कमालीचे आहेत. साऊंड इफेक्टमुळे कथेत आणखी मजा येते. या चित्रपटाचा पूर्वार्ध कमालीचा आहे. पण उत्तरार्ध कथेच्या बाबतीत थोडा कमकुवत ठरतो.

चित्रपट पहावा का?

हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहिल्यास ‘पैसा वसूल’ची भावना नक्कीच मनात येईल. लाँग वीकेंड असल्याने थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहायचा प्लॅन करत असाल तर ‘स्त्री 2’ बघू शकता. मनोरंजनाच्या बाबतीत हा चित्रपट तुम्हाला निराश करणार नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;