शिवसेना भवनाच्या प्रांगणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
आज देशाचा 78 वा स्वातंत्र्यदिन. देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दादर येथील शिवसेना भवनाच्या प्रांगणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, खासदार अनिल देसाई, आमदार अजय चौधरी, आमदार सचिन अहिर, आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) सचिव वरूण सरदेसाई, शिवसेनेचे नेते, उपनेते, विभागप्रमुख, पदाधिकारी यासह असंख्य शिवसैनिक आणि शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते.
15 ऑगस्ट 1947 रोजी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिशांच्या जोखडातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी असंख्य देशभक्तांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले. देशासाठी प्राणांची आहुती दिली. शिवसेनेनेही देशाभिमान सदैव जपला. 15 ऑगस्टला स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला तिरंगा राष्ट्रध्वज फडकवून देशाप्रति आदर व्यक्त केला जातो. याच निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी दिली गेली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List